मुंबई प्रतिनिधी | शेतकरी उपाशी सरकार तुपाशी अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या परिसरात घोषणा बाजी केली आहे. विधी मंडळाचे शेवटचे अधिवेशन असल्याने सरकारला घेरण्याची कोणतीच कसर विरोधक ठेवणार नाहीत अशी स्थिती सध्या आहे.
तर विखे पाटील यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी देखील विखे पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. गृह निर्माण खात्यावर सतत टीका करणारे विखे पाटील आता गृहनिर्माण खात्याचा कारभार कसा करतात ते बघूच असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरी विरोधी, जनता विरोधी अशा आभासी सरकारचा निषेध केला.#monsoonsession #आभासी_सरकार pic.twitter.com/TU3WBpWnfD
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 17, 2019
अधिवेशनासाठी मुख्यमंत्री येताच विरोधकांनी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. या प्रसंगी आसाराम गयाराम जय श्रीराम अशी घोषणा दिली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले कि माझी भूमिका मी सभागृहात मांडेल. अशी सभागृहाबाहेर भूमिका मांडणे मला उचित वाटत नाही. तर विरोधकांच्या या घोषणेच्या विरोधात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आहेत.