हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं. यावेळी राज्य सरकार कडून आरोग्य विभागासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे अस अजित पवार म्हणाले, यासाठी सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येतील. तसंच रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपकरणंही लावण्यात येणार आहेत.असे अजितदादा म्हणाले.
यावेळी अजित पवार यांनी सर्व कोविड योद्धांचे आभार मानले. महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्याचा मानस आहे. महाराष्ट्र कधीही संकटापुढे झुकला नाही. सध्या कोरोनाचं संकट आहे. आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं असल्याचं ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’