हिंगोली । राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तरी सरकारने आता जागे झाले पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे सर्व जण मीडियात येऊन माईकसमोर बोलतात. मग प्रत्यक्ष निर्णय कोण घेणार? सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी बिलकूल गांभीर्य नाही. सरकारमधील नेत्यांकडून केवळ टिंगलटवाळी, डायलॉगबाजी आणि वेळकाढूपणा सुरु आहे. हे सर्व थांबवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे व तात्काळ कारवाई केली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
जयंत पाटलांना फडणवीसांचे प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला कोणताही अर्थ राहिलेला नाही. मुख्यमंत्री योग्यप्रकारे काम करत असल्याचे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आम्हाला जयंत पाटलांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्हाला खरखोटं ठरवण्यापेक्षा जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करावी. अजूनही अनेक भागांमध्ये पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांनी बोलघेवडेपणा सोडून कृतीवर भर द्यावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले गोत्यात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस जारी
वाचा सविस्तर -👉 https://t.co/56krcM0YTW@BSKoshyari @CMOMaharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 20, 2020
Breaking News
'नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून दारुडे आहेत'; प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका
वाचा सविस्तर -👉 https://t.co/7dNckOTr7T@narendramodi @PMOIndia @Prksh_Ambedkar #HelloMaharashtra #Corona— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 20, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”