हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थितीबाबत माहिती देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शहरी भागातून गावात आलेल्या नागरिकांशी माणुसकीने वागा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. गावात परत आलेल्या पुणे आणि मुंबईतील नागरिकांकडे कुणीही संशयाने पाहू नये. या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायाचा आहे. गावाकडं आलेल्या लोकांमध्ये काही लक्षण आढळल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जावं. पण गावात येऊन देणार नाही, ही भूमिका राज्याला शोभणारी नाही, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.
बुधवारी गुढीपाडवा आहे. हा आपल्या सगळ्यांच्या संकल्पाचा दिवस. मी घरी थांबणार आणि करोनाला हरवणार हा संकल्प करा आणि करोनाला हरवा असं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. अनेक ठिकाणी डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत ते बंद करणं योग्य नाही. संचारबंदीतही आरोग्य सेवांना सूट दिलेली आहे. लोक आजारी पडले तर त्यांनी काय करायचं? त्यामुळे ओपीडी बंद करु नका अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.