मुंबई । जागतिक आरोग्य संघटनेन कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर एकच उपाय सर्व देशांना सुचवला आहे तो म्हणजे टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट. जो देश जितक्या जास्त कोरोना टेस्ट करेल त्या देशात कोरोनाचा फैलाव होण्यास रोखता येऊन या महामारीवर लवकर नियंत्रण मिळवता येईल. असं असताना टेस्ट बाबतीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आश्वासक आणि दिलासादायक माहिती दिली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात हे सर्वात जास्त कोरोना टेस्ट करणार राज्य असल्याचे टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात जास्त आहेत कारण महाराष्ट्रात चाचण्या सर्वाधिक होत आहेत. तसेच कोरोना टेस्टमध्ये आढळलेले ७० टक्के पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती चांगली आहे. ५ टक्के रुग्णांची अवस्था ही थोडी चिंताजनक आहे. असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ८४१ कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ६६६वर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर सर्वात जास्त कोरोना टेस्ट घेण्यात राजस्थानचा क्रमांक लागतो. राजस्थानमध्ये आतापर्यंत २४ हजार ८५७ कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर ६७८ कोरोनाचे रुग्ण राजस्थानमध्ये आतापर्यंत आढळले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील लॉकडाउन वाढवण्यात आला आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या काळात शिस्त पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर हा कालावधी आणखी वाढू शकतो असंही राजेश टोपे यांनी दिलं. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे झोन तयार केले जातील असेही संकेत राजेश टोपे यांनी दिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”