जळगाव : हॅलो महाराष्ट्र – आपल्या मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. समुद्रात बुडाल्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत तरुण हा आपल्या मित्रांसोबत बुलेटवरून गोव्याला गेला होता. हा तरुण मूळ जळगावमधील भुसावळचा रहिवासी होता. मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेला असताना हा दुर्दैवी अपघात झाला आहे. विवेक सुरेश मुराई असे या मृत तरुणाचे नाव आहे. मृत विवेक हा रेल्वे विभागातील सीनियर शिक्षण इंजिनिअर पदावर कार्यरत होता.
बुलेटने गोव्याला प्रवास
भुसावळहून मित्रांसोबत बुलेट बाईकने प्रवास करत गोव्याला फिरायला गेलेल्या विवेक सुरेश मुराई या 25 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. गोव्यातील समुद्रात बुडून विवेकचा मृत्यू झाला आहे. विवेक सुरेश मुराई हा रेल्वेच्या सिनिअर सेक्शन विभागात इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. गोव्याला सर्व मित्र फिरायला गेले होते. गोव्याला पोहोचल्यानंतर विवेकचे आपल्या आईशी बोलणे झाले होते.
समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेला
मृत विजय हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी समुद्रात उतरला मात्र त्याला समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो लाटेसोबत वाहून गेल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. या आपला तरुण पोरगा गमावल्याने विजयच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.