मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ च्या निवडणुका न लढण्याचे पत्रक मनसेने जाहीर केले आहे. मनसे फक्त विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे इतर पक्षांना याच फायदा होऊ शकतो.
मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने, मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि उपनगरातील मतं आपल्याला मिळतील अशी आशा शिवसेना आणि राष्ट्रवादीला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार असल्याची चर्चा आहे. मात्र मनसेची मतं ही पारंपारिक आपलीच असल्याचा दावा शिवसेनेकडून नेहमीच केला जातो.
मनसेच्या या निर्णयामुळे कोणत्या पक्षाला याचा फायदा होते हे निवडणुकीनंतरच कळेल. लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यावर विधानसभा निवणुकीसाठी मनसेकडून कशाप्रकारे तयारी करते हे पाहावे लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही एकट्या पक्षाला स्थान नाही, त्यामुळे मनसेने घेतलेला निर्णय राजकीय शहाणपण असल्याचं जाणकार यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
चंद्रपूर शहरातील असली किन्नारांना नकली किन्नरांकडून बेदम मारहाण
यशवंत चव्हाण यांचा वारसा चालविण्यासाठी नवीन पिढीची गरज आहे – शरद पवार