सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माढात लोकसभेसाठी दुसरा उमेदवार अजूनही घोषित करण्यात आला नाही. लोकसभा मतदारसंघ माढा इथे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. मात्र त्यातही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय झालेला नाही. माढ्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत. मोहिते कुटुंब भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.आज अकलूज येथे दुपारी विजयसिंह मोहिते यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे या बैठकीकडे आणि मोहिते पाटलांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख या दोघांची नावं चर्चेत आहेत. प्रभाकर देशमुख यांच्या नावावर राष्ट्रवादी शिक्कमोर्तब करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील नाराज होणार हे निश्चित आहे. जर विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली तर, त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सोलापुरातील गटबाजीमुळेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना निवडणूक लढण्याची विनंती केली होती. त्यानंतर पवारांनीही आधी निवडणूक लढण्याची घोषणा केली, मात्र नंतर पार्थ पवार यांना मावळची उमेदवारी जाहीर करताना, एकाच घरात तीन तीन उमेदवार नको म्हणून, स्वत:ची उमेदवारी मागे घेतली.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात विवेक ओबेरॉय दिसेल ‘या’ विविध रूपांत
मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा