पनवेल प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या प्रचार सभेसाठी लोकांची आधीच गर्दी तुरळक होती त्यात राष्ट्रवादीचे नेते सभेसाठी उपस्थित राहणार नाहीत हे समजताच उपस्थित लोकांनी देखील सभेतून काढता पाय घेतला. त्याच प्रमाणे शेकापचे आमदार भरसभेत व्यसपीठावर डुलक्या मारू लागल्याने दिखील हि सभा चर्चेचा विषय बनली आहे.
सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
पार्थ पवार यांच्या प्रचार सभेसाठी सुप्रिया सुळे , उदयनराजे भोसले, जयंत पाटील, सुनिल तटकरे , शशिकांत शिंदे आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार होते. मात्र ऐनवेळी या पैकी फक्त सुनिल तटकरे आणि शशिकांत शिंदे हेच दोन नेते उपस्थित रहीले बाकीचे नेते सभेसाठी येणारच नाहीत हे समजताच उपस्थितांनी सभेतून काढता पाय घेतला.
पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ
मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्या विरोधात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने प्रचारात मुसंडी मारली असली तरी शिवसेनेने राष्ट्रवादीला जंग जंग पछाडले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाचा जय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान काल गिरीष बापट यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात मावळ लोकसभा मतदारसंघासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
मावळात राष्ट्रवादीची खेळी ; गिरीष बापटांची निवडणूक आयोगाकडे तक्रार