विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; ‘इतके’ दिवस चालणार कामकाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन पावसामुळे सध्या सर्वत्र गारवा निर्माण झाला असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. अशात आता महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन दि. 17 जुलैपासून सुरु होणार असून ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईत होणारे अधिवेशन 15 दिवस सुरू राहणार आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात आता शिंदे-फडणवीस यांच्यासोबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट पहायला मिळणार आहे.

यंदाचं पावसाळी अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार आहे. यातील महत्वाचा मुद्दा हा राष्ट्रवादीतून बंड करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या अपशपथविधीनंतर प्रथमच विरोधक व सत्ताधारी अधिवेशनाच्या निमित्ताने समोर येत आहेत.आता अजित पवारांच्या बंडाचे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद पाहायला मिळणार आहेत.