दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

राज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. राज्यासह परभणी जिल्ह्यातही ही बस सेवा पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यावर आता जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचे आदेश आल्यानंतर, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे.

ज्यामध्ये जिंतूर , मानवत , पाथरी आणि इतर तालुक्यांना काही नियम आणि अटीसह बस सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली असून, बस मधील एकूण आसन क्षमतेपेक्षा, अर्धे प्रवासी नेण्याची मुभा या बसेसना देण्यात आली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून रस्त्यावरून गायब असलेली एसटी आता पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असला, तरीही बसेसच्या निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेकडे महामंडळाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment