राज्यात दिवसभरात १००८ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ११ हजार ५०६ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आज दिवसभरात राज्यात १००८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या यामुळे ११ हजार ५०६ वर पोहोचली आहे. आज १०६ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात २६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेंटमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७९२ कंटेंटमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ८४९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

कोरोनाग्रस्तांची जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे –

मुंबई महानगरपालिका: ७८१२ (२९५)
ठाणे: ५१ (२)
ठाणे मनपा: ४३८ (७)
नवी मुंबई मनपा: १९३ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १७९ (३)
उल्हासनगर मनपा: ३
भिवंडी निजामपूर मनपा: १७ (१)
मीरा भाईंदर मनपा: १३५ (२)
पालघर: ४४ (१)
वसई विरार मनपा: १३५ (३)
रायगड: २६ (१)
पनवेल मनपा: ४८ (२)
ठाणे मंडळ एकूण: ९०८१ (३२०)

नाशिक: ६
नाशिक मनपा: ३५
मालेगाव मनपा: २०१ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८(२)
धुळे मनपा: १८ (१)
जळगाव: ३४ (११)
जळगाव मनपा: १० (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: ३६५ (३०)

पुणे:६८ (४)
पुणे मनपा: ११७६ (९२)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: १०१ (६)
सातारा: ३२ (२)
पुणे मंडळ एकूण: १४५६ (१०७)

कोल्हापूर: ९
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: २९
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: २ (१)
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५५ (३)

औरंगाबाद:२
औरंगाबाद मनपा: १५९ (८)
जालना: ३
हिंगोली: २२
परभणी: १ (१)
परभणी मनपा: २
औरंगाबाद मंडळ एकूण: १८९ (९)

लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ४
लातूर मंडळ एकूण: २० (२)

अकोला: १२ (१)
अकोला मनपा: २७
अमरावती: २
अमरावती मनपा: २६ (७)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २
अकोला मंडळ एकूण: १६९ (९)

नागपूर: ६
नागपूर मनपा: १३३ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १४४ (२)

इतर राज्ये: २७ (३)
एकूण: ११,५०६ (४८५)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”