पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत ऑफिसमधून तरुणीचे अपहरण; थरार CCTVमध्ये कैद

पुणे । पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. या अपहरणाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. याप्रकरणी अवघ्या ६ तासांच्या आत चिंचवड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केलीय. शंतनू चिंचवडे वय असे आरोपी तरुणाचे नाव असून, तरुणी आणि आरोपी शंतनू चिंचवडे यांच्या दोघांमधील प्रेम … Read more

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन’मध्ये नोंद

पिंप्री चिंचवड । महाराष्ट्र पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘आयर्न मॅन किताब’ पटकविल्याबद्दल त्यांच्या नावाचा समावेश “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन” मध्ये करण्यात आला. आयपीएस-आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, पॅरामिलटरीमधील “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये नोंद होणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. … Read more

आई-बाबा माफ करा! अशी फेसबुक पोस्ट लिहून तरुणी आत्महत्येसाठी पडली घराबाहेर, आणि..

पुणे । फेसबुक पोस्ट टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव पुणे पोलिसांनी वाचवला आहे. नोकरी मिळत नसल्याने मनोधैर्य खचल्यामुळे तरुणीने थेट आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु फेसबुक पोस्ट वेळीच पोलिसांपर्यंत पोहचल्यामुळे तरुणीचा जीव वाचला. 30 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. (Pune Girl saved by Police after suicide attempt warning Facebook post) … Read more

कारभारीण लै भारी! निवडणूक जिकंलेल्या पतीला खांद्यावर उचलत पत्नीकडून विजय साजरा

पुणे । ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयाची मिरवणूक आणि जल्लोषाचा गुलाल उधळायला सर्वचजण सज्ज होते. मात्र, कोरोनामुळे मिरवणुकीला बंदी घालण्यात आली होती. पण पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील एका उमेदवाराच्या विजयाची अनोखी मिरवणूक लक्षवेधी ठरली. कारण, येथे कार्यकर्त्यांऐवजी चक्क पत्नीनेच आपल्या विजयी उमेदवार पतीला चक्क खांद्यावर उचलून घेतले होते. गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी … Read more

सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह कुटुंबियांना ‘स्वरगंधा सांगितिक कुटुंब पुरस्कार’ जाहीर

पुणे | गानवर्धन संस्थेतर्फे शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबियांना कै. स्वरगंधा टिळक स्मृती सांगितिक कुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी, संध्याकाळी 5.00 वाजता, टिळक स्मारक मंदिर सभागृहात सिम्बाॅयोसीस शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमुख पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते … Read more

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, … Read more

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण

पुणे, दि.१५ |  खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती … Read more

पुण्यातून कोरोना लसीचा पहिला डोस रवाना, 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूने आजपासून आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचा पहिला डोस रवाना करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. … Read more

धक्कादायक !! धावत्या बसमध्ये किन्नर कडून तरुणीवर बलात्कार; गोंदियाहून पुण्याकडे येताना घडला प्रकार

bus Rape

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | एका खाजगी बस मध्ये किन्नरकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत्या बसमध्ये चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी एक तरुणी गोंदियाहून पुण्याकडे येण्यास खाजगी बसमध्ये चढली होती. किन्नरने तिला मागील सीटवर बसवून तिचा प्रथम विनयभंग केला. त्यानंतर चाकूचा … Read more

भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत; पुण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे । भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद … Read more