वडारवस्तीतील घरे जळाल्याने रस्त्यावर आलेल्या ४५ कुटुंबांना सरकारचे रेशन कधी मिळणार?

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणार्‍या वडार वस्तीत १९ मार्चला अचानक लागलेल्या आगील ४५ कुटुंब घरा जळाल्याने रस्त्यावर आली. डोक्यावरचं छत्रच हरपल्याने यातील अनेकांसमोर जगण्यामरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आगीत सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने सरकारी योजनांचा लाभ घ्यायला अडचणी येत आहेत. शासनाकडून अद्याप रेशन मिळालेले नसल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली … Read more

…आणि बार्टी संस्थेनं ५०० बेघरांना रोज जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला

लढा कोरोनाशी | कुणाल शिरसाठे कोरोना विषाणूंचा सामूहिक फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक-एक करून पाऊले उचलली आणि देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संचारबंदीची घोषणा केली. घराच्या बाहेर पडायचे नाही, सर्व कामे ठप्प आणि ज्यांचे पोट हातावर आहे त्यांचे तर जगणंच ठप्प. पण हे संकट जास्त वाढू द्यायचे नसेल तर ही पाऊले आपण टाकली … Read more

येरवडा कारागृहातील ८६७ कैदी उपोषणाला बसण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा व्हायरसचा संसर्ग धोका लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने देशातील कारागृहातील कैद्यांना ६ महिन्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे आदेश जेल प्रशासनाला दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट असतानाही जेल प्रशासन आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप येरवडा कारागृहातील कैद्यांनी केला आहे. त्यामुळं आता येरवडा कारागृहातील ८६७ कैदी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत अशी … Read more

निजामुद्दीन मरकज: पुण्यातील ६० जण क्वारंटाइनमध्ये, इतरांचा शोध सुरू -जिल्हाधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी ‘मरकज’मधील कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली … Read more

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता ३०२ वरुन ३२१ वर पोहोचला आहे. मुंबईत १६ तर पुण्यात २ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिथे जिथे कोरोनाचे पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तो भाग बृहमुंबई महापालिकेकडून सील करण्यात आला आहे. तसेच मुंबईत … Read more

स्पर्धा परीक्षा क्लास चालकांनी शुल्क कमी करावे अन्यथा क्लासचा कालावधी वाढवावा – आमदार रोहित पवार

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षार्थी यांच्या साठी स्पर्धा परीक्षा क्लासचालक यांना काही अंशी शुल्क कपातीसाठी आवाहन केले आहे.  सध्याच्या कठीण काळात आता प्रत्येक घटकांसोबत न्याय भूमिका घेणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात अनेक शेतकरी कुटुंबातील मुलं व मुली पुण्यात व अन्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारी साठी मोठ्या संख्येने जातात. … Read more

दिलासादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये ५ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा ५ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाशी यशस्वी सामना केल्याबद्दल भोसरी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज केलेले ३ आणि आजचे … Read more

कोरोना संशयितांचा सर्वे करण्यासाठी पुणे मनपा कर्मचारी घराघरात जाणार, मात्र दर्जाहीन मास्क अन् अपुऱ्या सेनिटायझर विनाच?

पुणे प्रतिनिधी | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनाचे ८७३ रुग्ण सापडलेत तर राज्यात १६७ रुग्ण पोझिटीव्ह सापडले आहेत. पुण्यात एकुण २० रुग्ण सापडले आहेत. मात्र मागील ५४ तासात शहरात एकही रुग्ण न सापडल्याने पालिका प्रशासनाने कोरोनावर केलेली उपाययोजना योग्य असल्याचे दिसत अाहे. आता पुणे मनपा नागरिकांच्या घराघरात जाऊन कोरोनाची संशयितांचा सर्वे … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५६ वर, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण; तुमच्या जिल्ह्यात किती?

मुंबई प्रतिनिधी । देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८४३ झाली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या १५६ वर पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात कोरोनाचे एकूण १५६ रुग्ण सापडले आहेत. सांगलीत आज सर्वाधिक म्हणजे १२ कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. Coronavirus Maharashtra Update आज सकाळी कोल्हापुरात २ कोरोनाचे … Read more

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

मुंबई प्रतिनिधी ।  कोरोनाचा धोका आता वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७०० पार झालीय. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात कोरोनाचे एकूण १४७ रुग्ण सापडले आहेत. आज सकाळी कोल्हापुरात २ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कोरोना स्थिरावताना दिसतोय. तसेच विदर्भासाठीही कोरोनाचा धोका वाढला आहे. नागपुरात आज … Read more