औंधला शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम; रंगरंगोटी स्वच्छतेची कामे सुरू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी व मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवी व राजवाडयातील कराडदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार दि.26 पासून प्रारंभ होत आहे. 26 सप्टेंबर ते गुरूवार दि.6 आँक्टोंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे अशी माहिती श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. सोमवारी सकाळी श्री कराडदेवीची … Read more

Satara News : महामार्गावरील मोरीत अर्धवट जाळलेल्या मृतदेहाचे कर्नाटक कनेक्शन? पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागाव- वनवासमाची गावच्या हद्दीत बांधण्यात येत असलेल्या मोरीत काल शुक्रवारी सकाळी अर्धवट जाळण्यात आलेल्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या घटनेनंतर तळबीड पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. या मृतदेह जळीत प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात … Read more

Satara News : खून करून होता 36 वर्ष फरार; बाप्पाच्या विसर्जनासाठी घरी आला अन् पडल्या बेड्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुमारे 36 वर्षांपूर्वी एका खुनातील फरार आरोपीस अटक करण्यात कराड पोलिसांना अखेर यश आलं आहे. सन 1983 साली कराड तालुक्यातील पाल येथे कोयता, कुऱ्हाडीने खून करून मनव येथील एकजण फरार झाला होता. तो गणपती विसर्जनासाठी आपल्या घरी आला. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मध्यरात्रीच सापळा रचून त्याला अटक केली. लाला सिद्ध्राम … Read more

Satara News : कराडात पोलिसांच्या बाप्पांचे झाले विसर्जन; फुगड्या अन् ढोल ताशांच्या गजरात ‘खाकी’ ही नाचली!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सवातील अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत पोलीस बांधवांनी कायदा-सुव्यवस्थेचे कर्तव्य पार पाडले अन् दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) रात्री पारंपारिक वाद्यांच्या गजरात कराड शहर पोलीस स्टेशनच्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. बंदोबस्ताचा थकवा विसरून लाडक्या गणरायाला निरोप देताना खाकी वर्दीतील माणसं सुद्धा देहभान हरपून नाचली. कराड शहर पोलीस ठाण्यात दरवर्षी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. परंपरेनुसार यंदाही … Read more

Satara News : पुणे-बंगळूर महामार्गावर वनवासमाची हद्दीत आढळला अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणरायाच्या विसर्जनानंतर आज पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची-वहागाव हद्दीत सर्व्हिस रस्त्यावर नाल्यामध्ये अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जळालेल्या अवस्थतेत मृतदेह आढळून आल्यामुळे … Read more

Satara News : ढोल ताशांच्या गजरात अन् डीजेच्या ठेक्यात सातारकरांकडून गणरायाला निरोप…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ढोल ताशांच्या गजरात तसेच झांज पथकांच्या गजरामध्ये आणि लेझीम पथकांच्या साक्षीने “गणपती बाप्पा मोरया’ पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांच्या निनादात सातारा जिल्हा वासियांनी गणरायाचे विसर्जन केले. सातारा जिल्ह्यामध्ये असेल्या एकूण 3 हजार 921 सार्वजनिक गणेश मंडळांचे व घरगुती गणपतीचे नदी, कृतीम जलकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी कराड, वाई, फलटण, सातारा, … Read more

प्रेरणादायी नवदुर्गा : सानिका यादवची कुटुंबातील अडचणीवर मात करत NEET व CET परिक्षेत उत्तुंग झेप

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नवदुर्गा ही नोकरी करणारी किंवा लग्न झालेली गृहीणीच असते असे नाही. काही युवतीही आपल्या वागणूकीतून, जबाबदारीतून व यशातून नवदुर्गाच ठरतात. माण तालुक्यातील सानिका सदाशिव यादव ही महाविद्यालयीन युवतीही नवदुर्गा अगदी थोड्या काळात पडलेल्या जबाबदारीतून ठरते. या नवदुर्गेने आपल्यावर असलेल्या अपेक्षांची पूर्ती करत नीट, सीईटी परिक्षेत 720 पैकी 663 गुण मिळवत … Read more

Satara News : अजितदादा महायुतीत आल्याने BJP वर परिणाम नाही : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा भूंकप झाला. काका शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्याच्या सरकारमध्ये सहभागी होण्यावर भाजपचे साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी एक विधान … Read more

Satara News : उदयनराजेंच्या कॉलर उडवणे, डान्स करण्यावर केंद्रीय मंत्री मिश्रांनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे काल जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी जिल्ह्यात झाले. यावेळी त्यांचे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या व डान्स करण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. ‘तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे पक्षाच्या … Read more

Satara News : म्हसवड येथे डंपरची दुचाकीला जोरात धडक; युवक जागीच ठार तर युवती गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड जवळ मंगळवारी दि. २६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. येथील मायणी चौकात भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला तर युवती गंभीर जखमी झाली. अपघातातील जखमी युवतीचे … Read more