सांगली : हॅलो महाराष्ट्र – कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातील दुष्काळी भागातही जोरदार पाऊस पडला आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर येथील मंदिरात पाऊसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे भक्तांवर पाण्यतून प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली आहे.
सांगलीत मान्सूनपूर्व पावसाने घातले थैमान, गुड्डापूर मंदिर परिसरात साचले गुडघाभर पाणी pic.twitter.com/Pn32wbaqDx
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 20, 2022
तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर मंदिरात पाणीच पाणी झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते. मुसळधार पाऊस पडल्याने या मंदिर परिसरात गुडघाभर पाणी साचले आहे. तेथील एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. दुष्काळी जत तालुक्यातही गेल्या बारा तासापासून मान्सूनपूर्व धुवाधार असा पाऊस पडत आहे, पूर्व भागात पावसाची संततधार ही अद्याप कायम आहे.
गेल्या अनेक वर्षातील हा सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. या पावसामुळे जत तालुक्यात बहुतांशी ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वळसंग ते सोर्डी, वळसंग ते कोळीगिरी हे रस्ते पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आले आहेत. तसेच उमराणी, बिळुर, मुचुंडी, शेगाव, वाळेखिंडी ,जत या शहरातदेखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
हे पण वाचा :
तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान
केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन
उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब