मुंबई । महाराष्ट्रात आज ७ हजार ८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २२६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सद्यस्थितीला कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. पैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आजतागायत राज्यातील ९ हजार ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
राज्यातील रुग्णांचा मृत्यू दर हा ४.१५ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत १२ लाख ५३ हजार ९७८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने सकारात्मक आढळून आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यातील मुंबई-२३ हजार ३५, ठाणे ३० हजार ९७७, पुणे-१८ हजार ६८०, सातारा- ६११, नाशिक- २६८३, जळगाव-१७८७, औरंगाबाद-३८०६, नागपूर- ५२७ या शहरांमध्ये इतके रुग्ण आहेत.
7862 new #COVID19 positive cases, 226 deaths and 5366 people discharged today in Maharashtra. The total number of positive cases in the state stands at 2,38,461 including 9,893 deaths and 1,32,625 people recovered: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/IqO1KJXbz8
— ANI (@ANI) July 10, 2020
गरज असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडायचं असेल तर मास्क जरुर लावा. बाहेरुन घरात आल्यानंतर हात आणि पाय स्वच्छ धुवा. जेवणात लसूण, हळद, काळे मिरे, लवंग यांचा वापर वाढवा. स्वतःची काळजी घ्या. वास आणि चव गेल्यास किंवा कोरोनाची काहीही लक्षणं आढळल्यास तातडीने तपासणी करुन घ्या. घाबरु नका मात्र काळजी घ्या असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. तसंच बाहेर गेल्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळा असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.