राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Varsha Gaikwad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना मुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून येत्या सोमवारी म्हणजे 24 तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता त्यावर त्यांनी मंजुरी दिली आहे.

येत्या सोमवार पासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील.

पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.