मुंबई प्रतिनिधी |आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल कमालीचा खाली घसरला आहे. महाराष्ट्राचा निकाल ७७.१० % एवढा लागला असून हा निकाल गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. तर राज्यात मुलींनीपुन्हा एकदा मुलांना निकालात मागे टाकले आहे.
निकालीतील उचांक कोकण विभागाने नोंदवला असून कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागचा आगळा आहे. ६७.२७ टक्के एवढा कमी निकाल नागपूर विभागात लागला आहे. mahresult.nic.in या संकेत स्थळावर इयत्ता १० वीचा निकाल बघता येणार आहे.
विभागवार निकाल
महाराष्ट्राची निकालातील एकूण टक्केवारी :७७.१० टक्के
कोकण विभाग (सर्वाधिक) : ८८.३८ टक्के
नागपूर विभाग (सर्वात कमी): ६७.२७ टक्के
मुंबई विभाग : ७७.०४ टक्के
पुणे विभाग : ८२.४८ टक्के
कोल्हापूर विभाग : ८६.५८ टक्के
औरंगाबाद विभाग : ७५.२० टक्के
नाशिक विभाग : ७७.५८ टक्के
लातूर विभाग : ७२.८७ टक्के
अमरावती विभाग : ७१.९८ टक्के
एकूण १ हजार ७९४शाळांचा निकाल १०० टक्के