गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच घरातील ३ ठार ; मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

0
79
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वसमत प्रतिनिधी |हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावी झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई वडील आणि त्यांची वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी या अपघातात ठार झाली आहेत.

२ मेच्या मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास हा गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात सोनाजी दळवी, सुरेखा दळवी हे पतिपत्नी आणि त्यांची पूजा दळवी हि बीएचएमएसचं शिक्षण घेणारी मुलगी जागीच ठार झाली आहे. पूजा हि पुण्याच्या डी. व्हाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी असून ती सुट्टीसाठी आपल्या राहत्या घरी आली होती. तेव्हाच तिच्यावर काळाने घाला घातला आहे. डॉ.देवदत्त दळवी हा त्याच कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे. मात्र तो एम डी प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी नांदेड या ठिकाणी असल्याने तो या अपघातातून बचावला आहे.

सोनाजी दळवी कुरुंदा या गावी शेतीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजराण करत होते. शेती व्यवसायातून आलेल्या पैशातूनच त्यांनी आपल्या मुलाला एमबीबीएस हे वैद्यकीय क्षेत्रातीलसर्वोच्च शिक्षण दिले होते. तर मुलगी पूजा हिला बीएचएमएसचं शिक्षण देत होते. अशा कष्टाळू कुटुंबावर असा अकाली मृत्यू ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here