हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून महाराष्ट्रासारखंच गोव्यात देखील महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. त्यामुळे गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो असे संजय राऊत यांनी म्हंटल. तसेच गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्याचा समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी हवेत गोळीबार मारू नये, कोणी कोणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर भाजप नेते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर तो त्यांनी घ्यावा. पण मी अजून सांगतो की हे सरकार अजून 3 वर्ष उत्तम प्रकारे चालेल असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.