महाविकास आघाडीचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार ः देवेंद्र फडणवीस

मुंबई | पश्चिम बंगालची जनता जिगरबाज आहे, तशीच महाराष्ट्राची जनता जिगरबाज आहे. त्यांनी तुम्हांला आणि भाजपाला निवडून दिले होते. फक्त तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात केला. महाराष्ट्रात योग्य वेळी सरकारचा, करेक्ट कार्यक्रम करणारच असे वक्तव्य भाजपाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी विचाराला आरसा दाखविण्याचा काम पंढरपूरच्या जनतेने केले आहे. प्रशांत परिचारक व उमेश परिचारक समाधान आवताडे यांच्या पाठिशी राम- लक्ष्मणाच्या जोडीप्रमाणे पाठिशी उभे राहिले. महाविकास आघाडीने साम- दंड- भेद यांचा वापर केला. भाजपच्या सर्वांनी एकत्रितपणे काम करत होती. या सरकारने कोरोनाच्या कुणालाच मदत केली नाही. सरकारच्या विरोधात नाराजी होती, ती आज भाजपाला विठ्ठलाचा आशिर्वाद मिळाला आहे.
तुम्ही समाधान आवताडे यांना निवडूण दिले, आता या सरकारचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. परंतु आज कोरोनाशी लढाई करायची आहे, सरकारशी नाही. महाविकास आघाडीच्या प्रतिक्रीया म्हणजे दुसऱ्यांच्या घरी मुलगा झाला म्हणून मिठाई वाटतायत अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
You might also like