गड आला पण सिंह गेला; ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला असून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे उमेदवार सुवेन्दू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव तर तृणमूल काॅंग्रेसचा विजय निश्चित दुपारपासूनच ठरलेला होता. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅंनर्जी यांची जागा पिछाडीवर होती. सुवेंदी अधिकारी हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी अवस्था तृणमूल काॅंग्रेसची होईल असे बोलले जात होते. अखेर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला.

भाजपने पश्चिम बंगाल निवडणूकीत जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचार करत होते. येवडच नव्हे तर ममता बॅनर्जी यांचे अनेक सहकारी भाजप कडून फोडण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment