हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mahila Samman Savings Certificate : या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. जी 1 एप्रिलपासून लागू झाली आहे. ही वन टाइम स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे जी दोन वर्षांसाठी दिली जाईल. शुक्रवारी राजपत्रात याबाबत एक अधिसूचना रिलीज करून ही माहिती देण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेबाबत घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की,”मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना उपलब्ध करून देण्यात येईल.”
या योजनेबाबत बोलायचे झाले तर ही योजना महिला किंवा मुलींच्या नावाने दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुरु करता येईल. यामध्ये 7.5 टक्के निश्चित व्याज दराने आंशिक पैसे काढण्याच्या पर्याय देखील उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत कमीत कमी 1,000 रुपये आणि कमाल जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येतील. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत वार्षिक 7.5 टक्के दराने तिमाही आधारावर चक्रवाढ व्याज दिले जाईल. Mahila Samman Savings Certificate
यामध्ये उघडलेले खाते हे सिंगल अकाउंट होल्डर अकाउंट असेल. हे खाते डिपॉझिट केल्याच्या तारखेपासून दोन वर्षांनंतर मॅच्युर होईल. तसेच यामध्ये खातेदाराला खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर मात्र त्याच्या मुदतपूर्तीआधी पात्र शिलकीपैकी जास्तीत जास्त 40 टक्के रक्कम काढता येईल. Mahila Samman Savings Certificate
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx
हे पण वाचा :
Property Tax म्हणजे काय ??? ते भरण्याचे फायदे जाणून घ्या
एप्रिलपासून Life Insurance पॉलिसी महागणार, जाणून घ्या यामागील कारणे
FD Rates : ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक व्याजदर, तपासा लिस्ट
Pan Card नसेल तर FD वर द्यावा लागेल दुप्पट टॅक्स, जाणून घ्या त्याबाबतचा नियम
Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये 1 एप्रिलपासून होणार तीन मोठे बदल