हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Mahindra XUV400) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक SUV – Mahindra XUV400 सादर केली आहे . या इलेक्ट्रिक XUV400 चे बुकिंग जानेवारी 2023 पासून सुरू होईल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊयात या कारचे टॉप पॉइंट्स जे ग्राहकांना आकर्षित करणार आहेत.
फीचर्स –
महिंद्राच्या या इलेक्ट्रिक XUV400 मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, (Mahindra XUV400) डिजिटल इंस्ट्रुमेंटल क्लस्टर, एरोडायनॅमिक स्वरूपात डिजाइन करण्यात आलेले 17-इंचाचे अलॉय व्हील, ड्युअल-जोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम, रेन सेंसिंग वाइपरसह ऑटो हेडलॅम्प, टाइप-सी चार्जिंग आउटलेट आणि अनेक शानदार फीचर्स मिळतील.
456 किमी रेंज – (Mahindra XUV400)
XUV400 मध्ये 39.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक (Mahindra XUV400) वापरण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक कार 147 bhp पॉवर आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 456 किमी पर्यंत चालवता येते. या इलेक्ट्रिक गाडीचे टॉप स्पीड 150 किमी प्रतितास आहे. विशेष म्हणजे फक्त 50 मिनिटांत ही कार 80% पर्यंत फास्ट चार्ज केली जाऊ शकते.
4 सेकंदात 0 ते 60 किमीचा वेग गाठते-
भारतात बनवलेल्या या (Mahindra XUV400) कारमध्ये इलेक्ट्रीफाईड ट्विन पीक लोगो आहे. जर तुम्ही स्पीड प्रेमी असाल आणि तुमचा गैरसमज असेल की इलेक्ट्रिक वाहने जास्त स्पीड पकडत नाहीत, तर ही कार तुमचा गैरसमज दूर करेल, कारण ही इलेक्ट्रिक गाडी अवघ्या 4 सेकंदात 0 ते 60 किमीचा वेग गाठते तसेच 8 सेकंदात 0 ते 100 किमी पर्यंत वेग वाढविण्यास सक्षम आहे. महिंद्राची ही EV XUV400 ची स्पर्धा सध्या बाजारात असलेल्या Tata Nexon EV शी होणार आहे.
हे पण वाचा :
Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल इतके मायलेज
HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार
Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते