मैं हूं डॉन गाणे ऐकताच काँग्रेसचे आमदार झाले बेभान

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेसचा (congress) आमदार हातामध्ये बंदुक घेऊन नाचताना दिसत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या (congress) आमदाराचे नाव सुनील सराफ असे आहे. या प्रकरणी आमदार सुनील सराफ यांच्या विरोधात कोतमा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन वर्षाचं स्वागत आणि आमदार सुनील सराफ यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे एका ठिकाणी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्पिकरवरती गाणी सुरु होती. त्यावेळी काही मंडळी स्टेजवर डान्स करत होते. यानंतर ज्यावेळी मंचावर मैं हूं डॉन… हे गाणं सुरु होतं. त्यावेळी आमदार सुनील सराफ मंचावर जातात. तिथल्या लोकांसोबत डान्स करु लागतात.

यावेळी डान्स करत असताना आमदार सुनील सराफ त्यांच्याकडे असलेली बंदुक काढतात आणि हवेत गोळीबार करतात. हा व्हिडिओ त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने (congress) आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे आमदार सुनील सराफ यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…