Sugarcane Farming : ऊसाची पाचट कशी कुजवावी? खत नियोजन, औषध फवारणीबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या

sugarcane Panchat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे. ऊस हे एक नगदी पीक आहे बक्कळ पैसा मिळवतो म्हणून शेतकरी उसाची लागण करत असतो. परंतु शेतातील सगळा ऊस तुटून गेल्यानंतर ती पाचट. ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी पाचट पेटवून खोडवा ऊसाची तयारी करू लागतात. मात्र, हेच पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते. आणि त्यातून सेंद्रिय कर्ब वाढून उत्पादनात देखील वाढ होते. इतकेच नाही तर पाचट कुजवल्याने पर्यावरणाचे संवर्धनही होते. पाहु या पाचट कशा प्रकारे कुजवून त्याचे कशा प्रकारे व्यवस्थापन करता येते.

शेतातील ऊस तुटून कारखान्याला गेल्यावर मागे राहिलेली पाचट शेतकर्याच्या पीक उत्पन्नात वाढ देऊ शकते. अशा हि रानातील पाचट सुद्धा फायदेशीर ठरते. उसाच्या पाचटात ०.४o ते ०.५० टक्के नत्र, ०.१५ ते ०.२० टक्के स्फुरद आणि o.९ ते १ टक्के पालाश तसेच ३२ ते ४0 टक्के सेंद्रिय कर्ब असते. असे पाचट जाळल्यामुळे त्यातील सेंद्रिय कर्बाचा पुर्णत: नाश होतो.

शेतकरी मित्रानो आपल्याला बऱ्याचदा ऊस बियाणासाठी आपल्या गावाजवळील, तालुक्यातील, जिल्ह्यातील रोपवाटिकांची माहिती नसते. तसेच पिकाच्या व्यवस्थापनासाठी अनेक कृषी तज्ञांशी संपर्क साधता येत नाही. तुम्हालाही शेतीसंबंधी मार्गदर्शन हवे असेल तर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करायचं आहे. यामधील पीक व्यवस्थापन मध्ये गेल्यानंतर कोणत्या प्रकारचे पीक उत्पन्न वाढीसाठी वाण घ्यायचे, याविषयी माहिती मिळू शकेल. यासोबत आपल्याला शेतीतील इतर व्यवसायासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या योजनांची माहिती आदी गोष्टीही Hello Krushi अँपवर पाहता येतात.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here…

पाचट कुजविण्यासाठी कल्चर यंत्राचा वापर

1) अशा प्रकारे पाचटीचे व्यवस्थापन करावे

– प्रथम ऊसतुटून गेल्यावर ऊसाची शिल्लक राहिलेली पाचट शेतातच कुजवावी.

– पाचट कुजविण्यासाठी कल्चर यंत्राचा वापर करावा.

– ट्रॅक्टरच्या साह्याने कल्चर च्या मदतीने त्या पाचटिची बारीक कुटी, भुगा करावा.

– भुगा केल्यानंतर शेतामध्ये युरिया आणि सुफर फास्फेट खत टाकावे

– ऊस तुटून गेल्यावर त्याच रानात पाणी सोडून द्यावे.

– खत टाकल्यानंतर पाण्यामध्ये पाचट भिजून ती पूर्णपणे कुजवून जाते.

– पाचट शेतात कुजल्याणारे ओलावा राहतो शिवाय शेतामध्ये तण कमी उगावते

– पाचट कुजल्यामुळे शेताला खतांची आवश्यकता कमी भासते/

पाचट कुजवण्याचे फायदे

2) पाचट कुजवण्याचे ‘हे’ आहेत फायदे

– किमान एका हेक्टरात 8 ते 10 टन पाचट मिळते.

– पाचटाद्वारे हेक्टरी ४ ते ५ टन सेंद्रिय खत मिळते

– पाचट पसरल्याने जमिनीची धूप कमी होते. ओलावाही राहतो. त्यामुळे पाण्याची बचत होते.

– पाचटामुळे जमिनीतील ओलावा पंधरा ते वीस दिवस टिकून राहतो.

– पाचटातून 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फूरद, 1 टक्का पालाश तर 32 ते 40 टक्के सेंद्रिय अर्ब मिळते.

– पाचटातून 40 किलो नत्र, 20 ते 30 स्फूरद आणि 75 ते 100 किलो पालाश मिळते.

– सेंद्रिय अर्बाच्या माध्यमातून जमिनीची सुपिकता वाढन्यास मदत होते.

– सेंद्रिय पदार्थ कुजत असल्याने कार्बन डायअॅक्साईड वायू बाहेर पडतो

– हा वायू पिकांना कर्बग्रहण कार्यात उपयोगी ठरतो.

पाचट

3) पाचट जाळल्याने काय नुकसान होते?

– पाचट जळल्यामुळे आणि आगीमुळे जमिनीचा पोत सुधरवणाऱ्या जीव आणि जंतूंचा नाश होतो.

– धुरामुळे वातावरण सुद्धा दूषित होते. तसेच आगीमुळे जमिनीचा ऱ्हास सुद्धा होतो.

pachat

4) उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती

शेताच्या बाहेर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक टन पाचटासाठी २ मीटर रुंद व १ मीटर खोल आणि ५ ते ६ मीटर लांबीचा खडुा घ्यावा तसेच शक्य झाल्यास त्या पाचटाचे लहान तुकडे करावे. त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते. पाचटाचा सुरुवातीला २० ते ३० सें.मी. जाडीचा थर देऊन या थरावर एक टन पाचटासाठी ८ किलो युरिया व १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १०० लिटर पाणी शिंपडावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणा-या जिवाणू संवर्धनाचे मिश्रण असलेला शेणकाला समप्रमाणात पाचटावर टाकावा. तसेच आवश्यकता वाटल्यास जास्त पाणी शिंपडावे. रासायनिक खतांचे द्रावण व जिवाणू संवर्धनाच्या द्रावणांचे एकत्रित मिश्रण न वापरता स्वतंत्रपणे वापरावे. अशारितीने पाचटाचे वरचा भाग शेणमातीने झाकून घ्यावा. एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची चाळणी करावी व आवश्यकतेनुसार खडुयामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शिंपडावे. साधारणत: ६० टक्के ओलावा राहील या बेताने पाण्याचा वापर करावा. अशाप्रकारे चार ते साडेचार महिन्यात पाचटापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.

पाचटामध्ये असतात अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

पाचटामध्ये असतात हि अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

नत्र +0.5 +लोह +2440
स्फुरद +0.13 +मंगल +310
पालाश +0.40 +जस्त +90
कॅल्शिअम +0.55 +तांबे +30
मॅग्नेशिअम +0.30 +
गंधक +0.12

उसामध्ये पाचट लवकर कुजण्यासाठी औषधे

उसामध्ये पाचट लवकर कुजण्यासाठी घ्यावीत ही औषधे

1) शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत.

2) बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.

3) शेतात पसरलेल्या पाचटावर प्रतिहेक्‍टरी 80 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू वापरावेत. त्यानंतर उसास पाणी द्यावे.

4) खोडव्याला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची खतमात्रा द्यावी. पहिली खतमात्रा 15 दिवसांच्या आत पहारीने बुडख्यांपासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर 15 ते 20 सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला द्यावी.

५) दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.