धुळे प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वर मध्यराञी भिषण अपघात झाला.सेंधव्याहुन मजुरांनी भरलेला टेम्पो हा शिरुड चौफुली जवळील पुलावरुन नदी पाञात पडुन 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मजुरीसाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला .
सेधवाहुन पिकअप व्हँन मधुन चाळीसगाव रोड मार्गाने पिकअप व्हँन मध्ये तीस मजुर हे चाळीसगावकडे जाताना शिरुड चौफुली जवळील ब्रिटीश कालीन विंचूर गावाचे नदीवर असलेला पुलावरुन जात होता . मध्यराञी पाऊण वाजताच्या सुमारास चालक हा खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने पुलाहुन नदीपाञात वीस फुट खाली कोसळला. यावेळी गाडीतील तीस प्रवासी नदी पाञात पडले . यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. या अपघातात सहा महिन्यांचे बाळ पाण्यात पडल्याने बुडून दगावले.
अपघाताची माहिती तालुका पोलीसांना कळाली . त्यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या चालकाने पाण्यात पडलेल्या मजुरांच्या मुलांना बाहेर काढले. मदती करता महामार्ग पोलीस,चाळीसगाव रोड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.जखमी व मयतांना तीन रुग्ण वाहिकेतून तातडीने उपचारार्थ चक्करबर्डी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. राञी अंधार व नदी पाञात वाहणारे पाणी यामुळे मदत कार्यात अडथळे आले. उशीरा पर्यत तालुका पोलीसांत नोंद करण्याचे काम सुरु होते.