कोलकात्यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून मोठी कारवाई, 300 कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कोलकाता येथील एका व्यवसायिक गटाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. लोखंडी, पोलाद आणि चहाच्या व्यवसायांशी संबंधित कोलकाता येथील बिझनेस ग्रुपच्या जागेवर छापे टाकताना त्यांची 300 कोटी रुपयांची अघोषित मिळकत (Undisclosed Income) शोधून काढली. याबाबत सीबीडीटी (CBDT) ने सोमवारी सांगितले.

व्यवसाय गटाच्या अनेक जागांवर छापे
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Taxes) सांगितले की, वित्तीय विवरणपत्रे व अन्य स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 29 जानेवारीला कोलकाता, जमशेदपूर, भुवनेश्वर, हैदराबाद, मुंबई आणि अन्य काही ठिकाणी या समुहाच्या 25 जागांवर छापे टाकले गेले.

309 कोटी रुपयांचे उत्पन्न लपविल्याचा प्रकार उघडकीस आला
कर विभागासाठी पॉलिसी ठरविण्याचे काम सीबीडीटी करते. सीबीडीटीने एका निवेदनात म्हटले आहे की, एकूण 309 कोटी रुपयांचे उत्पन्न लपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे की,”या कारवाईमुळे बनावट शेअर्स भांडवल आणि असुरक्षित कर्जासाठी वापरल्या जाणार्‍या कागदी कंपन्यांची माहिती देण्यात आली. अशा व्यवहाराचा तपशीलही सापडला जे रेकॉर्डमध्ये नोंदवलेले नाहीत.” सीबीडीटीने सांगितले की,”या समुहातील लोकं बेनामी पैसे मिळविण्यासाठी छद्म किंवा कागदावरील कंपन्यांचा वापर करतात.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.