हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या उन्हाळा सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि थंडगार होण्यासाठी काय प्यावं याचा विचार आपण सतत करत असतो. तुम्ही सुद्धा आरोग्याची काळजी राखत उन्हाळ्यात काही पोषक स्वरूपात थंडगार पिण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बनाना शेकची रिसिपी घेऊन आलो आहोत. बनाना शेक (Banana Shake) हे चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय योग्य असल्यामुळे याचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरते.
बनाना शेक साठी लागणारे साहित्य –
केळी – २
मध – 1 चमचा
कच्चे दूध – 2 कप
गूळ – 1 चमचा
सुका मेवा – बदाम, काजू, मनुका,
बनाना शेक असा तयार करा-
सर्व प्रथम केळाची साल कडून त्याचे बारीक तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात टाका
त्यानंतर साखर आणि मध एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
नंतर मिक्सरच्या भांड्यात दूध टाका आणि ३ मिनिटे मिक्सर चालू ठेवा .
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यामध्ये सुका मेवा आणि बारीक करून काजू सुद्धा घालू शकता.
अशा प्रकारे तुम्ही अगदी कमी वेळेत बनाना शेक बनवू शकता.