हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळं गरीब मोबाईल धारकांसाठी मोबाईल सेवा फ्री करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधींनी यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांना एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात महानगरातून गावाकडे निघालेल्या अनेकांचा बॅलन्स संपला आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब आणि स्थलांतरितांचा विचार करत त्यांना एक महिन्यांसाठी मोबाईल सेवा फ्री करा असं प्रियांका यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून दिल्ली सारख्या महानगरातून मजूर, कामगारांचे महास्थलांतर पाहायला मिळत आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचे रोजगाराचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळं हलाखीच्या परिस्थितीत गावी निघालेल्या या मजुरांना आपल्या घरच्यांशी संवाद साधता यावा म्हणून त्यांना मोबाईल सेवा निशुल्क करण्याची मागणी प्रियांका गांधी यांनी केली आहे. या संदेर्भात भारतातील सर्व मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या मालकांना प्रियांका यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.