घरच्यांना Video कॉल करत तरुणाने उंच पुलावरून नदीत उडी घेतली अन्…

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक हृदय पिळवटुन टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील गिरणा नदीपात्रात एका तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्याअगोदर आपल्या घरच्यांना व्हिडिओ कॉल करून नदीपात्रात उडी घेतली. या तरुणाच्या नाका तोंडात पाणी शिरून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सुनील भगवान माळी असे आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मृत सुनील हा सटाणा तालुक्यातील उमाजीनगर येथील रहिवासी होता. शुक्रवारी मृत सुनीलने देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील एका पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. याअगोदर या तरुणाने आत्महत्या करण्याअगोदर व्हिडीओ कॉल करून आपल्या कुटुंबाशी संवाद साधला होता. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या तरुणाने घरगुती भांडण आणि दारुच्या नशेत हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळल्यानंतर देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने सुनीलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घरातील किरकोळ वादातून 32 वर्षीय सुनीलने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. देवळा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

You might also like