व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुरुडमध्ये रिक्षाला अपघात ! यामध्ये डोंबिवलीच्या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत

रायगड : हॅलो महाराष्ट्र – रायगडमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात डोंबिवलीतील एका दांपत्याचा दुर्दैवी अंत झाला आहे तर रिक्षा चालक अपघातातून थोडक्यात बचावला आहे.

नेमका कसा झाला अपघात ?
रायगड जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील भोईघर फाट्यापासून काही अंतरावर हा भीषण अपघात घडला आहे. बामणकोंडी वळणावर रिक्षा पलटी झाल्यामुळे त्यातून प्रवास करणाऱ्या दांपत्याचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. डोंबिवली सोनारपाडा या ठिकाणी राहणारे जगदीश मोतीराम वणे आणि ज्योत्स्ना जगदीश वणे हे दोघे पती – पत्नी मुरुड तालुक्यातील काजूवाडी या ठिकाणी रिक्षाने आले होते.

घटनेच्या दिवशी हे दांपत्य रात्री साडेआठच्या सुमारास काजूवाडी ते भोईघर मार्गे बोर्लीकडे येत होते. यावेळी अचानक रिक्षा बामणकोंडी वळणावर पलटी झाली. यानंतर जखमींना तातडीने बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुदैवाने रिक्षा चालक अभिषेक चंद्रकांत राजापरकर हे या अपघातातून बचावले आहेत. रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गणेश म्हात्रे हे या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.