मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | देशात नामांतराचे वारे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रातही अनेक शहरांची नावे नामकरण करण्याच्या प्रस्तावात आहेत. मधल्या काळात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावत ‘महाराज’ या शब्दाचा समावेश केला गेला. तर दादर स्टेशन चं नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर करण्याची मागणी भीम आर्मी ने केली होती. त्यात अजून एक‍ रेल्वे स्थानकांची भर पडली आहे.

ऐतिहासिक मुंबापुरी च्या बॉंम्बेचे नामकरण भाजप सेनेच्या युतीकाळात म्हणजेच १९९५ साली मुंबई असं करण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये शिव सेनेचा प्रमुख वाटा होता. नंतरच्या काळात अनेक स्थानकांची नाव बदलली तर काहीं नावांचे प्रस्ताव मुंबई महापालिकेकडे आहेत. त्यामध्ये अजून एक भर पडली आहे ती म्हणजे मलबार हिल स्थानकाची.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिव सेनेत प्रवेश केलेले दिलीप लांडे हे सध्या मुंबई महापालिकेचत सुधार समिती वर आहेत. त्यांनी हा प्रस्ताव मुंबई महापालिकेकडे पाठविला आहे. मुंबईतील ऐतिहासिक मलबार हिल मध्ये काही काळ प्रभू रामचंद्र, लक्ष्मण यांचं वास्तव्य असल्याच्या कारणाने हि मागणी समोर येत असल्याचं बोललं जात आहे.

ही स्थानक आहेत प्रस्तावित –

१८३५-४० दरम्यान मुंबई राज्याचे राज्यपाल रॉबर्ट ग्रॅन्ट यांचं नाव असलेलं स्थानक म्हणजे ग्रॅन्ट रोड त्याचं नाव ग्रामदेवी करण्याचा प्रस्ताव आहे. करी रोड चा लालबाग रेल्वे स्थानक, सॅन्डहर्स्ट ला डोंगरी, कॉटन ग्रीन ला काळा चौकी ,रे रोड ला घोडपदेव करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

इतर महत्वाचे –

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

उद्धव ठाकरेंची आता ‘पंढरीची वारी’ !

Leave a Comment