मोदींच्या बैठकीत आम्हांला बोलूच दिलं नाही; ममता बॅनर्जी भडकल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश होता. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्लाबोल केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.