हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 जागांवर विजयी होताना दिसत असून भाजपसाठी आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपने पश्चिम बंगाल निवडणूकीत जोर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचार करत होते. येवडच नव्हे तर ममता बॅनर्जी यांचे अनेक सहकारी भाजप कडून फोडण्यात आले. भाजपने साम, दाम, दंड ,भेद या सर्व गोष्टीचा वापर करून देखील ममता बॅनर्जी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता भाजपला आणि खास करून मोदी- शहांना हादरा दिला आहे.
मोदींविरोधातील एक दमदार प्रमुख नेत्या
दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या या दमदार यशामुळे देशपातळीवर मोदींविरोधातील एक दमदार प्रमुख नेत्या म्हणून त्या उदयास येऊ शकतात. सध्या देशात मोदींविरोधात अनेक पक्ष असताना देखील एक सक्षम चेहरा देशाला मिळालेला नाही. अशा वेळी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन ममता बॅनर्जी याना मोदींविरोधात एक सक्षम चेहरा म्हणून उभे करू शकतात.
काँग्रेसच अस्तित्व जाणवत नाही
भाजपला टक्कर देणारा देशपातळीवर राष्ट्रीय पक्ष हा जरी काँग्रेस असला तरी सध्या देशात कुठेच काँग्रेसच अस्तित्व जाणवत नाही. देशपातळीवर काँग्रेसचा असा एकही नेता दिसत नाही जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोरदार टक्कर देऊ शकतो. अशा वेळी देशातील सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधून त्याचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्या कडे दिलं तर देशाला इंदिरा गांधी यांच्यानंतर ची दुसरी सक्षम आयर्न लेडी मिळेल यात काही शंकाच नाही.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.