अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. ती म्हणजे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

पीडित तरुणी एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेली होती. यावेळी सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंबाने केला आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी एका कार्यक्रमात मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत वादग्रस्त विधान केले. ‘जर मुलगा आणि मुलगी प्रेमात असतील तर त्यांना थांबवणं माझं काम नाही. हा उत्तर प्रदेश नाही जिथे लव्ह जिहादविरोधात जातात. या ठिकाणी कुणालाही प्रेम करण्याचे स्वातंत्र्य आहे.’

शवविच्छेदन होण्याआधीच पीडितेवर अंत्यसंस्कार का करण्यात आले ? तसंच पाच दिवसांनी तक्रार का दाखल करण्यात आली? जर गुन्हा झाला असेल तर कारवाई होईल आणि याप्रकरणी कारवाई झाली आहे, असे यावेळी ममतांनी सांगितले.

या अत्याचाराच्या घटनेप्रकरणी याप्रकरणी स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या २० वर्षीय मुलाला पोलिसांनी अटकही केली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी लोकांनी मुख्यमंत्री निवडण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे असं म्हटलं आहे.