कोलकाता । पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सुरू झाला असून पहिल्या फेरीच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चार अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी स्वत: माहिती दिली आहे. ममता बॅनर्जींच्या पायावर अज्ञातांनी गाडी घातल्याचं बोललं जातंय. तृणमुल काँग्रेसने हे काम भाजपचे असल्याचा आरोप केला आहे.
#WATCH:"Not even one Police official was present. 4-5 people intentionally manhandled me in presence of public. No local police present during program not even SP. It was definitely a conspiracy. There were no police officials for 4-5 hrs in such huge public gathering" says WB CM pic.twitter.com/wJ9FbL96nX
— ANI (@ANI) March 10, 2021
यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप ममतांच्या वतीने करण्यात आला असला तरी भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.