लघवीतून रक्त येत होतं म्हणून डॉक्टरकडे गेला, यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तरुण हादरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एका व्यक्तीला लघवीतून रक्त येण्याची समस्या होती. जेव्हा तो डॉक्टरांकडे चेकअप करण्यासाठी गेला तेव्हा डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून तरुण मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी त्याला चेक केले असता त्या तरुणाच्या शरीरात ओवरी आणि गर्भाशय आढळून आले. एवढेच नाहीतर त्याला 20 वर्षांपासून मासिक पाळीही (Menstruation) येत होती. डॉक्टरांनी सांगितलं की, तो बायोलॉजिकली एक महिला आहे. ही घटना चीनच्या सिचुआन या भागामध्ये घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
33 वर्षीय चेन यू याच्या लघवीतून रक्त येत होतं. हे दाखवण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला होता. चेकअप केल्यावर समजलं की, प्रत्यक्षात त्याला मासिक पाळी (Menstruation) होत होती. ज्यामुळे त्याच्या लघवीतून रक्त येत होतं. हे सगळं गेल्या 20 वर्षांपासून सुरू होतं. हे समजल्यावर डॉक्टरसुद्धा हैराण झाले. डॉक्टरांना आधी वाटलं की, चेन च्या पोटात वेदना अपेंडिक्समुळे होत असेल पण उपचार करूनही वेदना कमी न झाल्याने डॉक्टरांनी पुन्हा त्याचं चेकअप केले असता हि गोष्ट समोर आली.

चेन यू 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून लघवीतून ब्लडच्या समस्येने पीडित होता आणि दर महिन्यात त्याच्या पोटातही दुखत (Menstruation) होतं. गेल्या महिन्यात डॉक्टरांनी 3 तासांची सर्जरी करून त्याच्या शरीरातून ओवरी आणि गर्भाशय काढला. चेन आता पूर्णपणे ठीक आहे आणि सध्या आराम करत आहे. तो लवकरच एका पुरूषासारखं सामान्य जीवन जगू शकेल. पण चेन हा बाळांना देऊ शकणार नाही कारण त्याचे टेस्टिकल्स स्पर्म प्रोड्यूस करत नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment