शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाविरोधात शिवसेना (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या (shiv sena) बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याविरुद्ध प्रचंड राग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मुख्य शिवसेनेत (shiv sena) असलेल्या आमदार-खासदार आणि नेत्यांमध्ये बंडखोरांविरोधात संताप आहे. तर दुसरीकडे बंडखोरांच्या गोटातील आमदारांचा संजय राऊत यांच्याविरोधात रोष आहे. महत्वाचे म्हणजे एवढे सगळे होऊनदेखील बंडखोर आमदारांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केलेली नाही.

काय म्हणाले विजय शिवतारे?
एकीकडे हे सगळे घडत असताना शिवसेनेचे (shiv sena) माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याची सूचना विजय शिवतारे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे, असे मोठे विधान विजय शिवतारे यांनी केले आहे. विशेष म्हणचे शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी फक्त शिवतारेच नाही तर अनेक आमदारांनी आतापर्यंत याबाबत भाष्य केलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप आणि टीका करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना (shiv sena) आमदार संजय गायकवाड यांनी मोठा इशारा दिला आहे. ठाकरे कुटुंबावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही हे किरीट सोमय्या यांनी लक्षात ठेवावं. अन्यथा आम्हाला सत्तेची देखील पर्वा करणार नाही, असे विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यामुळे आता बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र येतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment