व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तू खरंच प्रेम केले आहेस का ? युवकाने गर्लफ्रेंडसोबत केलेले कृत्य पाहून न्यायधीशसुद्धा हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतीच मन हेलावून टाकणारी एक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे. या आरोपी प्रियकराने या महिलेवर चाकूने 47 वेळा वार केले आहेत. यानंतर तो त्याच ठिकाणी उभा राहून तो पीडितेला तडफडताना पाहात होता. एवढेच नाही तर तो तिचा व्हिडिओ तोपर्यंत रेकॉर्ड करत राहिला जोपर्यंत तिच्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब खाली पडत नाही. हि मन हेलावून टाकणारी घटना कॅनडामध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण
आपल्या एक्स गर्लफ्रेंडची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव जेन असे आहे. त्याने 34 वर्षीय निकोल हिची निर्घृणपणे हत्या केली आहे. निकोलला एक दहा वर्षांचा मुलगासुद्धा आहे. न्यायालायने जेनला याप्रकरणी पंधरा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.जेनला या गोष्टीची भनक लागली की त्याच्यासोबत झालेल्या ब्रेकअपनंतर निकोल दुसऱ्या व्यक्तीला डेट करत आहे. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला. यानंतर त्याने याचा बदला घेण्याचे ठरवले अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एके दिवशी जेन निकोलला काहीतरी कारण सांगून आपल्यासोबत बाहेर घेऊन गेला आणि याचदरम्यान त्याने कारच्या मागच्या सीटवर निकोलची हत्या केली. जेनने निकोलवर धारदार शस्त्राने 47 वेळा वार केले आहेत. यानंतर आरोपीला जेनला शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हंटले, की हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. या घटनेनंतर जेनला काहीच भावना नाहीत, असे जाणवते. कदाचित त्याने कधी निकोलवर कधी प्रेमच केले नव्हते. कोणी एवढे निर्दयी कसं काय असू शकते ? या केसच्या सुनावणीदरम्यान निकोलच्या मित्र-मैत्रीणींची पत्रेसुद्धा वाचण्यात आली. यामधील एका पत्रामध्ये निकोलची खास मैत्रिण ऐशले हिने लिहिले कि जेन कधी निकोलला भेटलाच नसता तर किती बरं झाले असते.