लखनऊ : वृत्तसंस्था – आजकाल माणसाला कधी कुठे कसा मृत्यू येईल याचा काही नेम नाही. उत्तर प्रदेशमध्ये अशीच घटना समोर आली आहे. यामध्ये फतेहपूर जिल्ह्यात महाबली हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू (Dead) झाला आहे. हि धक्कादायक घटना धाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलेमपूर गावामध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
स्टेजवर हनुमानाची भूमिका साकारत असतानाच अचानक आला मृत्यू, Video आला समोर pic.twitter.com/pByqpU7O65
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 3, 2022
काय घडले नेमके ?
या ठिकाणी जागरण सुरू असताना लंका दहनाच्या कार्यक्रमादरम्यान नाचत असताना कलाकार रामस्वरूप अचानक स्टेजवरुन खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू (Dead) झाला. या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे शांतता पसरली. हि घटना घडली तेव्हा या कलाकाराची पत्नीदेखील त्या ठिकाणी हजर होती. तिने हे सगळे डोळ्यासमोर पाहिले आणि त्या ठिकाणी रडू लागली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नवरात्रीनिमित्त सलेमपूरमध्ये देवीच्या जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी पंडालमध्ये रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गावातील 50 वर्षीय रामस्वरूप महाबली हनुमानाची भूमिका करत होते. लंकेला आग लावण्यासाठी त्यांची शेपटी पेटवली गेली. मात्र, एका मिनिटानंतर त्यांना अचानक झटका आला. आणि ते स्टेजवरुन खाली पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यागोदरच त्यांचा मृत्यू (Dead) झाला होता.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय