Sunday, April 2, 2023

शरद पवार नावाचा माणूस…; पडळकरांची एकेरी शब्दांत टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार कुटुंबियांवर टीका करत असतात. आता त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून शरद पवारांवर एकेरी शब्दात टीका केली आहे. धनगर समाजाचा सर्वात मोठा वैचारिक शत्रू म्हणजे बारामतीचा शरद पवार आहे असं विधान त्यांनी केलं आहे. ते सांगलीतील आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात बोलत होते.

पडळकर म्हणाले, राजकारणामध्ये धनगर समाजाने पुढे आलं पाहिजे. बोललं पाहिजे तुम्ही शांत राहून चालणार नाही, सगळ्यांनी एकजूट करा असे पडळकर म्हणाले. धनगर समाजाचा सर्वात मोठा वैचारिक शत्रू म्हणजे बारामतीचा शरद पवार आहे. पवार नावाच्या जातीनं आपलं रक्त शोषण करून पिल आहे असे म्हणत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

शरद पवार हेलिकॉप्टर मधून आले तर तुम्ही म्हणता साहेब आले…साहेब आले पण त्यांना सांगू इच्छितो की, त्या हेलिकॉप्टरमध्ये तुमचा साहेब नाही तर, बहुजनांचा कर्दनकाळ बसला आहे. पवारांचं सरकार सत्तेवर होते त्यावेळी ओबीसीची फाईल जाग्यावरून हलली नाही. मात्र आपले सरकार सत्तेवर येताच 72 हजार ओबीसी वस्तिगृह मंजूर करून दिली, असा दावाही पडळकर यांनी केला.