हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे अत्यंत हुशार नेते म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या राजकारणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले संबंध हे सर्वपरिचित आहेत. नरेंद्र मोदी राज्याच्या राजकारणात त्यांचा शब्द मोदी अंतिम मानतात, असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या एका मोठ्या नेत्याने देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी याच्या नात्याबाबत अजब विधान केले आहे.
राजभवानातील दरबार हॉलमध्ये आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकित उद्योग समूह, रोजगार प्रदाते यांच्यासमवेत परिसंवाद तसेच 1.11 लाख रोजगारासाठी सामंजस्य करार झाला. यावेळी भाजपचे नेते, मंत्री मंगलप्रभात लोढा याणी देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानसपुत्र आहेत, असे विधान केले. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य मिळाले. ते आज सर्वांना नोकरी देत आहोत. मी पण 27 वर्षे अर्ज करत राहिलो पण यंदा मंत्री पदाची नोकरी मिळाली. त्याआधी तीन वर्षे इंटर्नशिपवर होतो, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.
राज्यात हजारो नोकऱ्या गेल्या म्हणून ओरडून सांगितले जाते. पण आम्ही या हॉलमध्ये एक लाख नोकऱ्या दिल्या आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असा टोला यावेळी मंत्री लोंढा यांनी विरोधकांना लगावला.
राजभवनातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारात 44 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सीचा समावेश आहे.