Monday, January 30, 2023

आता फोन आल्यास दिसणार Unkonwn ऐवजी थेट नाव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मोबाईलवर जर कुना अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास आपण काहीवेळ चिंतेत पडतो. कुणी फोन केलाय? सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉलच्या माध्यमातून बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे.

आतापर्यंत घेतलेल्या निर्णयामध्ये केंद्र सरकारचा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा, ऐतिहासिक असा निर्णय मानला जात आहे. विशेषत: सरकारच्या या निर्णयामुळे सायबर गुन्हयाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कारण मोबाईलच्या माध्यमातून Unkonwn नंबरवरुन फोन करणाऱ्याची माहिती सहज पोलिसांना उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, मोबाईलवर फोन करणाऱ्याचे थेट नावच मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे. विशेष म्हणजे सिम कार्ड विकत घेताना फॉर्मवर ज्या व्यक्तीचे नाव असणार आहे. त्या व्यक्तीचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे.