आंब्याची सालही आहे गुणकारी; होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंबा (Mango) म्हणजे फळांचा राजा…. प्रत्येकाला आवडणार फळ म्हणजे आंबा… खायला गोड आणि चवदार असल्याने आंबा म्हंटल कि अनेकांच्या जिभेला पाणी सुटत. सध्या तर आंब्याचा सिझन असून यंदाही आंब्याच्या मागणीत मोठी वाढ आहे. साधारणपणे आपण पाहतो, लोक आंबा आवडीने खातात मात्र त्याची साल काढून टाकतात. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल, आंबा तर खायला चांगला आहेच पण त्याची सालही (Mango Peel) आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. चला आज आम्ही तुम्हाला आंब्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहोत ते जाणून घ्या….

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी आंब्याची साल फायदेशीर आहे. आंब्याच्या सालीचं सेवन केल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे शुगर असलेल्या लोकांनी नियमितपणे आंब्याच्या सालीचं सेवन करायला पाहिजे.

आंब्याची साल चेहऱ्याला लावल्याने त्वचा उजळ होते तसेच या सालीची पेस्ट तयार करून तोंडाला लावली तर चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात . याशिवाय आंब्याच्या सालीमधे आर्द्रता असल्याने ती त्वचेवर मॉश्चरायझर म्हणूनही काम करते.

आंब्याच्या सालीमध्ये अनेक पोषकतत्व असतात. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या विकारापासून तुमची सुटका होते.

सर्वात स्वस्त आणि मस्त आंबा कुठे मिळतोय?

शेतकरी मित्रानो, आता तुम्हाला स्वस्तात मस्त आणि चांगल्या दर्जाचे आंबे घरबसल्या मिळत आहेत . तुम्ही थेट कोकणातून शेतकरी ते ग्राहक अशी आंब्याची खरेदी करू शकणार आहात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करावं लागेल. अँप ओपन करताच तुम्हाला त्यामध्ये शेतकरी दुकान दिसेल. या विभागातील शेतमाल या भागात जाऊन तुम्ही थेट शेतकऱ्यांकडून आंब्याची खरेदी करू शकता. अनेक शेतकरी मुंबई- पुणे सारख्या शहरी भागातही आंबा पोच करत आहेत. याशिवाय इंद्रायणी तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी सुद्धा तुम्ही हॅलो कृषी वरून अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

आंब्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. त्यामुळे फुफ्फुसांचा कॅन्सर, मेंदूचा किंवा आतड्यांचा कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आंब्याची साल नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

जे लोक लठ्ठ आहेत अशा लोकांना वजन कमी करण्यासाठी सुद्धा आंब्याची साल उपयुक्त आहे. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी सालीसकट आंबे खावेत