Manipur Violence : केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर Bomb टाकून हल्ला; संपूर्ण देश हादरला

Manipur Violence
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur Violence) सुरु आहे. अनेक प्रयत्न करूनही मणिपूर येथील वातावरण काय शांत होण्याची चिन्हे दिसतच नाही. आज तर या हिंसक आंदोलकांनी थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच लक्ष्य करत त्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला. यामुळे संपूर्ण घराला आग लागली. मात्र सुदैवाने यावेळी घरात कोणीही सदस्य नव्हतं त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

इंफाळमध्ये कर्फ्यू असतानाही मंत्र्यांच्या घरापर्यंत जमाव पोचला. यावेळी मंत्र्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात होते मात्र तरीही हा हिंसाचार रोखण्यात ते अपयशी ठरले. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त असूनही संतप्त जमावाने आरके रंजन सिंह यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून संपूर्ण घर पेटवून दिलं. या घटनेमुळे फक्त मणिपूरचे नव्हे तर संपूर्ण एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी 14 जून रोजी अज्ञात लोकांनी महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या घरालाही आग लावली होती.

दरम्यान, या घटनेनंतर आरके रंजन सिंह यांनी संतप्त आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. मी सध्या अधिकृत कामासाठी केरळमध्ये आहे. सुदैवाने काल रात्री माझ्या इंफाळच्या घरी कोणीही जखमी झाले नाही. काहीजण पेट्रोल बॉम्ब घेऊन आले आणि त्यांनी माझे घर जाळले. माझ्या गृहराज्यात जे काही घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. मी अजूनही शांततेचे आवाहन करत राहीन. जे असा हिंसाचार करतात ते पूर्णपणे अमानवी आहेत असं आरके रंजन सिंह यांनी म्हंटल.