“असा मस्तवालपणा, गुंडगिरी…”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपा नेते तथा केंद्रियनमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला. अर्ज फेटाळत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसांमध्ये हजर होण्याचे आदेशही दिले. यावरून शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा मस्तवालपणा, गुंडगिरी, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत”, असे शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “कायदा सर्वांसाठी समान असतो. कोणाचाही उन्माद कायदा खपवून घेत नाही. कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा गुंडगिरी, मस्तवालपणा, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत”, असे कायंदे यांनी म्हंटले आहे.

यावेळी पुढे त्या म्हणाल्या की, “लोकप्रतिनिधी, कोणीही असो कायद्यासमोर सर्व समान असतात. याची जाणीव आता तरी राणे कुटुंबाला होईल असं वाटतं. याच्यातून बोध घेतला पाहिजे. आता तरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे, असे कायंदे यांनी म्हंटले.

Leave a Comment