धक्कादायक ! जन्मदात्या बापाकडून तीन मुलांच्या हत्येचा प्रयत्न,आईस्क्रिममधून दिले विष

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतल्या मानखुर्दमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जन्मदात्या पित्याने आपल्या पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्दयी बापाने आईस्क्रिममधून पोटच्या तीन मुलांना विष दिले आहे. यामध्ये 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर बाकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मुलांच्या आईने मानखुर्द पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी बापावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बाप सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घरात झालेल्या वादातून चिडलेल्या आरोपी वडील मोहम्मद अली याने आपल्या तीन मुलांच्या आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळले. यामुळे तिन्ही मुलांना विषबाधा झाली. या घटनेत 5 वर्षांचा अलिशान अन्सारी याचा मृत्यू झाला आहे. तर 7 वर्षांची अलीना आणि 2 वर्षांचा अरमान यांच्यावर मानखुर्दमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.