सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; आझाद मैदानावर उपोषण करण्यास नकार

manoj jarange patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर आपल्या मराठा बांधवांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार होते. या आंदोलनासाठी सध्या मनोज जरांगे लाखो बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. परंतु त्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे.

नुकतीच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीमध्ये जरांगे पाटील यांना आझाद मैदान (Azad Maidan) किंवा शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park) आंदोलन करता येणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. याऐवजी ते खारघर इथल्या मैदानात आंदोलन करू शकतात असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. या नोटीशीला आता मराठा समाजाच्या बाजूने एडव्होकेट सतिश माने शिंदे कायदेशीर उत्तर देणार आहेत.

दरम्यान, मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांना नोटीस पाठवली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशावरूनच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये, जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आणि शिवाजी मैदानावर उपोषण करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.